खामगावच्या मंदिरातील दिवसाढवळ्या दानपेटी फोडून चोरी, घटना सीसीटीव्हीत कैद!

 

खामगाव :- शहरातील बालाजी प्लॉट परिसरातील महाराजा अग्रसेन भवनातील मंदिरात दिवसाढवळ्या दानपेटी फोडून रक्कम चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, मंदिराच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्याने मंदिरात प्रवेश करून दानपेटी फोडली व त्यातील रक्कम थैलीत भरून पसार झाला. विशेष म्हणजे, ही संपूर्ण घटना मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला असून, आरोपीचा लवकरात लवकर शोध घेण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला असून, संशयिताचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी मंदिर परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment