कल्पा पॉवर प्रकल्पातून कॉपर केबल चोरी; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा

मलकापूर : तालुक्यातील विवरा – भानगुरा शिवारातील सौरऊर्जा प्रकल्पात अज्ञात चोरट्यांनी धाड टाकत लाखो रुपयांचे साहित्य लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दसरखेड एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भानगुरा शिवारात असलेल्या कल्पा पॉवर प्रा. लि. या सौरऊर्जा प्रकल्पातील सुप्रिम ब्लॉक व नेटमेंक ब्लॉक परिसरात चोरीची घटना … Read more

मेहकर – जानेफळ मार्गावर भीषण अपघात; कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

मेहकर : – मेहकर–जानेफळ मार्गावर शुक्रवारी (२७ मार्च) दुपारी झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. भरधाव वेगाने येणाऱ्या स्विफ्ट कारने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. प्राप्त माहितीनुसार, जानेफळकडून मेहकरकडे येत असलेल्या एमएच १९ एएक्स ७२३३ क्रमांकाच्या स्विफ्ट कारने मेहकरहून जानेफळकडे जात असलेल्या दुचाकीस्वाराला घरकुल परिसरात … Read more

नांगरटी करताना ट्रॅक्टर उलटले; २४ वर्षीय चालकाचा मृत्यू

संग्रामपूर : शेतात नांगरटीचे काम करत असताना ट्रॅक्टर अचानक उलटून चालक तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना संग्रामपूर तालुक्यातील काकोडा येथे बुधवारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काकोडा येथील चोंढी टाकळेश्वर शिवारातील गट क्रमांक २१ मध्ये एका शेतकऱ्याच्या शेतात गणेश अर्जुन मानखैर (वय २४) हा युवक ट्रॅक्टरद्वारे नांगरटीचे काम करत होता. … Read more

भरधाव दुचाकीची धडक; ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू, अल्पवयीन चालकावर गुन्हा

खामगाव : शहरातील जलंब नाका वाडी रोड परिसरात भरधाव दुचाकीच्या धडकेत एका ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना २५ मार्च रोजी दुपारी घडली. निष्काळजीपणे वाहन चालवल्यामुळे हा अपघात घडल्याचे समोर आले असून खामगाव शहर पोलीस ठाण्यात अल्पवयीन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रामधन दशरथ ताठे (वय ७०, रा. कोक्ता, ता. खामगाव) हे … Read more

पोस्ट ऑफिसला बॉम्बने उडवून देण्याची ई-मेलद्वारे धमकी; बुलढाण्यात खळबळ

बुलढाणा : नागपूर पोस्ट ऑफिसला ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्यानंतर राज्यातील सर्व पोस्ट व पासपोर्ट कार्यालयांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर बुलढाणा येथील पोस्ट ऑफिसमध्ये पोलिसांनी बॉम्ब शोधक पथकाच्या मदतीने कसून तपासणी केली. मात्र तपासणीत कोणताही स्फोटक पदार्थ आढळून आला नसल्याने नागरिकांना घाबरण्याचे कारण नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर पोस्ट ऑफिसला … Read more

मागील भांडणाचा राग; मुलीची छेडछाड व मारहाण, आईच्या गळ्यातील सोन्याची पोथ तोडली

अंढेरा:- मागील भांडणाचा राग मनात धरून एका मुलीची छेडछाड करून तिला चापटा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच मुलीच्या आईच्या गळ्यातील सुमारे ३० हजार रुपयांची सोन्याची पोथ तोडून नुकसान करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना अंढेरा पोलीस ठाणे हद्दीत घडली. या प्रकरणी पोलिसांनी २५ मार्च रोजी पाच जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, … Read more

बसस्थानकातील गर्दीत महिलेच्या गळ्यातील सोन्याचे डोरले लंपास

बुलढाणा : बसस्थानकावरील प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे डोरले लंपास केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शितल रणजित जाधव (वय ३०, रा. छत्रपती संभाजीनगर) या मंगळवार, २४ मार्च रोजी बुलढाणा येथे त्यांच्या आतेभावाची भेट … Read more

खडकपूर्णा परिसरात अवैध रेती वाहतूक; तिघांवर गुन्हा

  देऊळगाव राजा :- तालुक्यातील खडकपूर्णा धरण परिसरात अवैध रेती वाहतुकीचा प्रकार उघडकीस आला असून, यासाठी थेट शेतातून बेकायदेशीर मार्ग तयार करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. ग्राम महसूल अधिकारी ज्ञानेश्वर तांबे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार परमेश्वर पटावकर, अंकुश भागिले आणि विश्मयबर देशमुख (सर्व रा. टाकरखेड भागिले, ता. … Read more

वांग्याच्या पिकात लपवून अफूची शेती; मध्यरात्री कारवाईत मोठा साठा जप्त!

देऊळगाव राजा :- तालुक्यातील मेरा खुर्द येथे वांग्याच्या पिकामध्ये अफूची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, स्थानिक गुन्हे शाखा व अंढेरा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मोठ्या प्रमाणात अफू जप्त केली आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २४ मार्चच्या मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखेचे पथक देऊळगाव राजा परिसरात गस्त घालत असताना … Read more

मलकापूर बस स्थानक परिसरात हातात गुप्ती घेऊन तरुणाचा राडा; गुन्हा दाखल

मलकापूर : शहरातील बसस्थानक परिसरात हातात गुप्ती घेऊन आरडाओरड करत दहशत निर्माण करणाऱ्या एका तरुणाला मलकापूर शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपीकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही परवाना नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल योगेश प्रभाकर तायडे यांना गुप्त माहिती मिळाली की, बसस्थानक परिसरातील … Read more