कल्पा पॉवर प्रकल्पातून कॉपर केबल चोरी; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा

मलकापूर : तालुक्यातील विवरा – भानगुरा शिवारातील सौरऊर्जा प्रकल्पात अज्ञात चोरट्यांनी धाड टाकत लाखो रुपयांचे साहित्य लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दसरखेड एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भानगुरा शिवारात असलेल्या कल्पा पॉवर प्रा. लि. या सौरऊर्जा प्रकल्पातील सुप्रिम ब्लॉक व नेटमेंक ब्लॉक परिसरात चोरीची घटना … Read more

हुंडा व संशयाच्या कारणावरून विवाहितेचा छळ; पतीसह सहा जणांवर गुन्हा!

मलकापूर :- शहरात हुंड्याच्या मागणीसह चारित्र्यावर संशय घेऊन विवाहित महिलेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिफा जमजम अरबाज खान (वय 23) यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. त्यांचा विवाह अरबाज खान असलम खान याच्याशी झाला होता. विवाहानंतर काही काळानंतर पतीसह कुटुंबीयांकडून हुंड्याची … Read more

सावत्र आईकडून बालिकेला मारहाण; 15 वर्षीय बालिकेची सुटका, मलकापूर तालुक्यातील घटना!

मलकापूर :- तालुक्यातील वरखेड येथे सावत्र आईकडून होत असलेल्या मारहाणीच्या प्रकारातून 15 वर्षीय बालिकेची चाइल्ड हेल्पलाइन 1098, जिल्हा बाल संरक्षण कक्ष व मलकापूर ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त कारवाईतून सुटका करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, 22 मार्च रोजी चाइल्ड हेल्पलाइनला संबंधित घटनेची माहिती प्राप्त होताच प्रकल्प समन्वयक शेख सोहेप यांनी तत्काळ दखल घेतली. त्यांनी जिल्हा महिला व बालविकास … Read more

शेतातून हळदीच्या बेण्याची मोठी चोरी; 13 पैकी 10 पोती लंपास

मेहकर :- तालुक्यातील हिवरा साबळे शिवारात शेतात ठेवलेले हळदीचे बेणे अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली असून, या प्रकारामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हिवरा साबळे येथील शेतकरी गजानन नारायण साबळे यांनी गट क्रमांक 15 मधील अर्धा एकर क्षेत्रात सेलम जातीची हळद लागवड केली होती. 22 मार्च रोजी त्यांनी हळद काढून … Read more