मेहकर – जानेफळ मार्गावर भीषण अपघात; कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

मेहकर : – मेहकर–जानेफळ मार्गावर शुक्रवारी (२७ मार्च) दुपारी झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. भरधाव वेगाने येणाऱ्या स्विफ्ट कारने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. प्राप्त माहितीनुसार, जानेफळकडून मेहकरकडे येत असलेल्या एमएच १९ एएक्स ७२३३ क्रमांकाच्या स्विफ्ट कारने मेहकरहून जानेफळकडे जात असलेल्या दुचाकीस्वाराला घरकुल परिसरात … Read more

शेतातून हळदीच्या बेण्याची मोठी चोरी; 13 पैकी 10 पोती लंपास

मेहकर :- तालुक्यातील हिवरा साबळे शिवारात शेतात ठेवलेले हळदीचे बेणे अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली असून, या प्रकारामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हिवरा साबळे येथील शेतकरी गजानन नारायण साबळे यांनी गट क्रमांक 15 मधील अर्धा एकर क्षेत्रात सेलम जातीची हळद लागवड केली होती. 22 मार्च रोजी त्यांनी हळद काढून … Read more

वीज कोसळून जगदंबा संस्थान प्रवेशद्वाराचे नुकसान; जीवितहानी टळली

मेहकर :- तालुक्यातील उकळी सुकळी येथे गुरुवारी सकाळी सुमारे 9 वाजताच्या सुमारास झालेल्या विजेच्या कडकडाटात जगदंबा संस्थानच्या प्रवेशद्वारावर वीज कोसळून नुकसान झाल्याची घटना घडली. या घटनेत प्रवेशद्वाराच्या वरच्या भागाचा काही अंश तुटून पडला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेच्या वेळी परिसरात ढगाळ वातावरणासह विजांचा जोरदार कडकडाट सुरू होता. अचानक झालेल्या विजेच्या प्रहारामुळे नागरिकांमध्ये काही … Read more

शेतात जेवणासाठी बसलेल्या महिलांवर ‘मोहोळा’चा अचानक हल्ला; ६ जण जखमी; मेहकर येथील घटना

मेहकर: परतापूर शिवारातील एका शेतात दुपारच्या सुमारास अचानक आग्या मोहोळाच्या हल्ल्यामुळे गोंधळ उडाला. जेवणासाठी झाडाखाली बसलेल्या महिलांवर माशांनी हल्ला चढवला. या घटनेत पाच महिला, एक लहान मुलगी तसेच जनावरे जखमी झाली असून सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रामनगर परिसरातील विजय रामदास गिहे यांच्या शेतात दुपारी काम आटोपल्यानंतर काही महिला मजूर जांभळीच्या झाडाखाली जेवण्यासाठी … Read more

हॉटेल च्या तळघरात सुरू होता कुटंखाना, पोलिसांनी डमी ग्राहक पाठविला, मग कार्यक्रम केला, हॉटेल ‘एकांत’ मधील देहव्यापार अड्ड्यावर छापा; तीन जण ताब्यात

मेहकर : शहरातील बायपास रोडवरील ‘एकांत हॉटेल अँड लॉजिंग’मध्ये सुरू असलेल्या देहव्यापाराच्या अड्ड्यावर मेहकर पोलिसांनी धाडसी छापा टाकत कुंटणखाना चालविणाऱ्या इसमासह दोन महिलांना ताब्यात घेतले. या प्रकरणी हॉटेल मालकासह संबंधितांविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, मेहकर बायपासवरील अर्धवट बांधकाम असलेल्या ‘एकांत हॉटेल अँड लॉजिंग’च्या तळघरात काही महिलांकडून … Read more