मेहकर – जानेफळ मार्गावर भीषण अपघात; कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

मेहकर : – मेहकर–जानेफळ मार्गावर शुक्रवारी (२७ मार्च) दुपारी झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. भरधाव वेगाने येणाऱ्या स्विफ्ट कारने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला.
प्राप्त माहितीनुसार, जानेफळकडून मेहकरकडे येत असलेल्या एमएच १९ एएक्स ७२३३ क्रमांकाच्या स्विफ्ट कारने मेहकरहून जानेफळकडे जात असलेल्या दुचाकीस्वाराला घरकुल परिसरात जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी होऊन घटनास्थळीच मृत्युमुखी पडला.
अपघात होताच परिसरात मोठी खळबळ उडाली. घटनास्थळी नागरिकांची गर्दी जमली असून स्थानिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व पुढील कारवाई सुरू केली.

Leave a Comment