सांडपाण्याच्या वादातून कुटुंबावर हल्ला; पाच जणांविरुद्ध गुन्हा

जलंब : “शेजारधर्म जपला तर वाद मिटतात; पण क्षुल्लक कारणालाही अहंकाराची किनार लागली की संघर्ष अटळ ठरतो.” सांडपाणी टाकण्याच्या कारणावरून झालेला किरकोळ वाद विकोपाला जाऊन एका कुटुंबाला शिवीगाळ, काठीने मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना जलंब येथे घडली. या प्रकरणी जलंब पोलिसांनी पाच जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी … Read more

भागीदारीच्या वादाची हिंसक परिणती; व्यावसायिकाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली, मलकापूर शहरातील घटना

मलकापूर : भागीदारीच्या व्यवहारातून निर्माण झालेला वाद अखेर हिंसक वळणावर पोहोचला. नांदुरा रोडवरील एका हॉटेलमध्ये व्यावसायिकाला बेदम मारहाण करत त्याच्या डोक्यात बिअरची बाटली फोडल्याची धक्कादायक घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. या हल्ल्यात व्यावसायिक गंभीर जखमी झाला असून, तक्रारीवरून मलकापूर शहर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेख शब्बीर शेख … Read more

समोरासमोरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; दुसरा चालक वाहन टाकून फरार, राष्ट्रीय महामार्ग ५३ वरील शेरे पंजाब ढाब्याजवळ भीषण अपघात

मलकापूर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर गुरुवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची तीव्रता एवढी होती की मृताच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. दरम्यान, दुसरा दुचाकीस्वार अपघातानंतर स्वतःची दुचाकी घटनास्थळीच सोडून फरार झाल्याने पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या … Read more

माहेरहून पैसे आणण्याच्या दबावाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; सासरच्या पाच जणांवर गुन्हा, मलकापूर तालुक्यातील घटना

मलकापूर : माहेरहून पैसे आणण्यासाठी सातत्याने दबाव टाकणे, शारीरिक व मानसिक छळ करणे आणि मारहाण केल्याच्या आरोपांमुळे त्रस्त झालेल्या विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील विवरा येथे घडली. या प्रकरणी मृत विवाहितेच्या भावाच्या तक्रारीवरून सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरीता धनराज पाटील (रा. विवरा, ता. मलकापूर) … Read more

“तू जास्त मस्ती करतोस” असे म्हणत लोखंडी रॉडने मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा, मलकापूर तालुक्यातील घटना

मलकापूर : तालुक्यातील पान्हेरा परिसरात झालेल्या वादातून एका व्यक्तीला लोखंडी रॉड व चापट-बुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अरुण श्यामराव तायडे (वय ४२, रा. पान्हेरा वडोदा, ता. मलकापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई … Read more

लग्नानंतर अवघ्या २७ दिवसांत काळाचा घाला; तरुणाचा अपघातात मृत्यू

बुलढाणा:- लग्न समारंभ आटोपून मित्रांसोबत घरी परतत असताना झालेल्या भीषण दुचाकी अपघातात २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना धाड नाक्याजवळील नांद्राकोळी मार्गावरील सागवान शिवारात २७ मे रोजी रात्री घडली. विशेष म्हणजे अवघ्या २७ दिवसांपूर्वीच विवाहबद्ध झालेल्या या तरुणाच्या निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सुंदरखेड (बुलढाणा) येथील तार … Read more

खून तपासातील हलगर्जीपणा भोवला; चार पोलिसांची नियंत्रण कक्षात उचलबांगडी; ‘मृत’ समजलेली तरुणी जिवंत आढळल्याने पोलीस तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह

आसलगाव :- जळगाव जामोद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजुरा शिवारात आढळलेल्या कथित खून प्रकरणाच्या तपासात गंभीर हलगर्जीपणा झाल्याचे उघड झाल्यानंतर जिल्हा पोलीस प्रशासनाने तातडीची कारवाई करत चार पोलीस कर्मचाऱ्यांची बुलढाणा पोलीस नियंत्रण कक्षात बदली केली आहे. मृत समजण्यात आलेली तरुणी प्रत्यक्षात जिवंत असल्याचे समोर आल्यानंतर या संपूर्ण तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलीस दलात एकच खळबळ … Read more

मुलगी परत आणण्याच्या कारणावरून आई-वडिलांना मारहाण; मुलगा व सुनेविरुद्ध खामगाव ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल

  खामगाव : तालुक्यातील हिंगणा कारेगाव येथे कौटुंबिक वादातून मुलगा व सुनेने आई-वडिलांना शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना २६ मे रोजी रात्री घडली. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जानराव जगदेव जाधव (वय ५५, रा. हिंगणा कारेगाव, ता. खामगाव) यांनी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल … Read more

बिबट्याचा मलकापूर तालुक्यात पुन्हा धुमाकूळ; दूधलगाव परिसरात शेतकऱ्याच्या गोऱ्यावर हल्ला; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

मलकापूर : तालुक्यातील ग्रामीण भागात बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढत असून, शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जुने दूधलगाव व नवे दूधलगाव खुर्द यांच्या मधील शेतशिवारात बिबट्याने पुन्हा धुमाकूळ घालत शेतकऱ्याच्या गोऱ्यावर हल्ला करून पळश्या पाडल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी ईश्वर पंडित कांडेलकर, रा. दूधलगाव ता. मलकापूर जि. बुलढाणा यांनी नेहमीप्रमाणे सायंकाळी … Read more

कल्पा पॉवर प्रकल्पातून कॉपर केबल चोरी; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा

मलकापूर : तालुक्यातील विवरा – भानगुरा शिवारातील सौरऊर्जा प्रकल्पात अज्ञात चोरट्यांनी धाड टाकत लाखो रुपयांचे साहित्य लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दसरखेड एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भानगुरा शिवारात असलेल्या कल्पा पॉवर प्रा. लि. या सौरऊर्जा प्रकल्पातील सुप्रिम ब्लॉक व नेटमेंक ब्लॉक परिसरात चोरीची घटना … Read more