“तू जास्त मस्ती करतोस” असे म्हणत लोखंडी रॉडने मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा, मलकापूर तालुक्यातील घटना

मलकापूर : तालुक्यातील पान्हेरा परिसरात झालेल्या वादातून एका व्यक्तीला लोखंडी रॉड व चापट-बुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अरुण श्यामराव तायडे (वय ४२, रा. पान्हेरा वडोदा, ता. मलकापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई … Read more

बिबट्याचा मलकापूर तालुक्यात पुन्हा धुमाकूळ; दूधलगाव परिसरात शेतकऱ्याच्या गोऱ्यावर हल्ला; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

मलकापूर : तालुक्यातील ग्रामीण भागात बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढत असून, शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जुने दूधलगाव व नवे दूधलगाव खुर्द यांच्या मधील शेतशिवारात बिबट्याने पुन्हा धुमाकूळ घालत शेतकऱ्याच्या गोऱ्यावर हल्ला करून पळश्या पाडल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी ईश्वर पंडित कांडेलकर, रा. दूधलगाव ता. मलकापूर जि. बुलढाणा यांनी नेहमीप्रमाणे सायंकाळी … Read more

कल्पा पॉवर प्रकल्पातून कॉपर केबल चोरी; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा

मलकापूर : तालुक्यातील विवरा – भानगुरा शिवारातील सौरऊर्जा प्रकल्पात अज्ञात चोरट्यांनी धाड टाकत लाखो रुपयांचे साहित्य लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दसरखेड एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भानगुरा शिवारात असलेल्या कल्पा पॉवर प्रा. लि. या सौरऊर्जा प्रकल्पातील सुप्रिम ब्लॉक व नेटमेंक ब्लॉक परिसरात चोरीची घटना … Read more

मलकापूर बस स्थानक परिसरात हातात गुप्ती घेऊन तरुणाचा राडा; गुन्हा दाखल

मलकापूर : शहरातील बसस्थानक परिसरात हातात गुप्ती घेऊन आरडाओरड करत दहशत निर्माण करणाऱ्या एका तरुणाला मलकापूर शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपीकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही परवाना नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल योगेश प्रभाकर तायडे यांना गुप्त माहिती मिळाली की, बसस्थानक परिसरातील … Read more

हुंडा व संशयाच्या कारणावरून विवाहितेचा छळ; पतीसह सहा जणांवर गुन्हा!

मलकापूर :- शहरात हुंड्याच्या मागणीसह चारित्र्यावर संशय घेऊन विवाहित महिलेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिफा जमजम अरबाज खान (वय 23) यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. त्यांचा विवाह अरबाज खान असलम खान याच्याशी झाला होता. विवाहानंतर काही काळानंतर पतीसह कुटुंबीयांकडून हुंड्याची … Read more

सावत्र आईकडून बालिकेला मारहाण; 15 वर्षीय बालिकेची सुटका, मलकापूर तालुक्यातील घटना!

मलकापूर :- तालुक्यातील वरखेड येथे सावत्र आईकडून होत असलेल्या मारहाणीच्या प्रकारातून 15 वर्षीय बालिकेची चाइल्ड हेल्पलाइन 1098, जिल्हा बाल संरक्षण कक्ष व मलकापूर ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त कारवाईतून सुटका करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, 22 मार्च रोजी चाइल्ड हेल्पलाइनला संबंधित घटनेची माहिती प्राप्त होताच प्रकल्प समन्वयक शेख सोहेप यांनी तत्काळ दखल घेतली. त्यांनी जिल्हा महिला व बालविकास … Read more

पैशांच्या वादातून मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल; मलकापूर शहरातील घटना

मलकापूर : पैशांच्या व्यवहारावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीस मारहाण केल्याची घटना समोर आली असून या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की , निपाणा (ता. मोताळा) येथील सौ. आशा सहदेव थाटे (वय ४१) यांनी तक्रार दिली आहे. तक्रारीत त्यांनी नमूद केले की, त्यांच्या पती सासऱ्यांच्या … Read more

बस स्थानक परिसरात महिलेच्या गळ्यातील पोथ लंपास; गत आठ महिन्यात २० ते २५ चोरीच्या घटना!

मलकापूर : – मलकापूर बस स्थानक परिसरात खामगाव येथे जात असलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीच्या गळ्यातील पोत चोरट्याने लंपास केल्याची घटना आज दि. २३ मार्च रोजी सकाळी ११.३० दरम्यान घडली. मलकापूर परिसरात गत आठ महिन्यात २० ते २५ चोरीच्या घटना घडल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.या बाबत सविस्तर वृत्त असे की, शेतकरी राजेश सुधाकर मांडवाले हे … Read more

मलकापुरात बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न!

मलकापूर :- शहरातील हनुमान चौक परिसरातील भारत कला रोडवरील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएमवर मध्यरात्री अज्ञात चोरट्याने फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री सुमारे 1 वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने एटीएम बूथमध्ये प्रवेश करून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड केली. त्यानंतर एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, मशीन … Read more

मलकापूर येथे संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे भव्य रक्तदान शिबिर संपन्न; ५० रक्तदात्यांनी केले रक्तदान 

मलकापूर :- रक्त हे रस्त्यावर वाहण्यापेक्षा मानवाच्या धमन्यांमध्ये वाहिले पाहिजे, हा मानवतावादी संदेश संपूर्ण विश्वाला देणारे युगपुरुष बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या शिकवणीनुसार आणि वर्तमान सद्‌गुरू माता सुदिक्षाजी महाराज यांच्या असीम कृपेने, संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन व मलकापूर शाखेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रविवार, दि.२२ मार्च २०२६, डॉ. हेडगेवार भवन, चांडक विद्यालय … Read more