पैशांच्या वादातून मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल; मलकापूर शहरातील घटना

मलकापूर : पैशांच्या व्यवहारावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीस मारहाण केल्याची घटना समोर आली असून या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की , निपाणा (ता. मोताळा) येथील सौ. आशा सहदेव थाटे (वय ४१) यांनी तक्रार दिली आहे. तक्रारीत त्यांनी नमूद केले की, त्यांच्या पती सासऱ्यांच्या घरासमोर उभे असताना आरोपी स्वनिल रामदास थाटे व रमेश सुरेश थाटे यांनी पैशांच्या कारणावरून वाद घालत त्यांना मारहाण केली. त्यानंतर जखमी पती घरी आल्यानंतर आरोपी दिपक रामदास थाटे हा त्यांच्या घरासमोर आला. त्यानेही पतीला मारहाण करत अश्लील शिवीगाळ केली. दरम्यान, स्वनिल रामदास थाटे, रमेश सुरेश थाटे आणि प्रवीण रामदास थाटे हेही तेथे येऊन फिर्यादीच्या पतीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या वेळी फिर्यादीचे सासरे मध्ये पडल्यावर त्यांनाही मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी स्वनिल रामदास थाटे, रमेश सुरेश थाटे, दिपक रामदास थाटे व प्रवीण रामदास थाटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सविता मोरे करीत आहेत.

Leave a Comment