हुंडा व संशयाच्या कारणावरून विवाहितेचा छळ; पतीसह सहा जणांवर गुन्हा!

मलकापूर :- शहरात हुंड्याच्या मागणीसह चारित्र्यावर संशय घेऊन विवाहित महिलेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिफा जमजम अरबाज खान (वय 23) यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. त्यांचा विवाह अरबाज खान असलम खान याच्याशी झाला होता. विवाहानंतर काही काळानंतर पतीसह कुटुंबीयांकडून हुंड्याची मागणी करण्यात येत असल्याचा तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन वारंवार त्रास दिला जात असल्याचा आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला आहे. या प्रकरणात असलम खान, अफरोज बी, उजमा नईम खान, नईम खान व नगमा राजीक शेख (रा. पुणे) यांनीही शिवीगाळ करून पतीला भडकवून छळास हातभार लावल्याचा आरोप करण्यात आला आहे. मे 2023 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीत हा प्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

Leave a Comment