मलकापूरात २२ ठिकाणी धाडी; ७ हॉटेलमधून घरगुती गॅस सिलेंडर जप्त

मलकापूर : घरगुती एलपीजी गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पुरवठा विभागाने शहरात मोठी कारवाई करत २० ते २२ हॉटेलांवर धाडी टाकल्या. या धाडीत सात हॉटेल धारकांकडून घरगुती गॅस सिलेंडरचा गैरवापर आढळून आल्याने ते जप्त करण्यात आले असून पुढील कारवाई सुरू आहे. सद्यस्थितीत इंधन तुटवड्याची शक्यता लक्षात घेता घरगुती गॅसचे वितरण सुरळीत राहावे, यासाठी केंद्र व राज्य … Read more

“सकाळी धक्का का दिला” म्हणत लोखंडी पाइपने मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा; मलकापूरातील घटना

मलकापूर : किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे गंभीर रूप घेत मारहाणीपर्यंत प्रकरण पोहोचल्याची घटना शहरातील मुस्ताक अलीनगर परिसरात घडली. या प्रकरणात लोखंडी पाइपने हल्ला करून अनेकांना जखमी केल्याप्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी शेख रिजवान शेख समशेर (वय ३८) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी जबीर खान इसा खान (वय १८) … Read more

जंगली प्राण्याच्या हल्ल्यात गाय व वासराची शिकार; काळेगाव शिवारात दहशत

मलकापूर : काळेगाव शिवारात जंगली प्राण्याचा मुक्त संचार वाढल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका गायीची शिकार झाल्याची घटना समोर आल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, १४ मार्च रोजी काळेगाव शिवारातील गणेश हरीचंद्र सुरोशे यांची गाय दिसून न आल्याने त्यांनी परिसरात शोध घेतला. शोध घेत असताना गजानन … Read more

मलकापूर येथील २७ वर्षीय युवक बेपत्ता; शोध घेण्यासाठी पोलिसांचे आवाहन

मलकापूर : शहरातील संचेती गल्ली परिसरातील २७ वर्षीय युवक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून, संबंधित युवकाचा अद्यापही कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. विशेष म्हणजे हा युवक जन्मापासून मुक असून मानसिकदृष्ट्या थोडा कमजोर असल्याने कुटुंबीयांची चिंता अधिक वाढली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, खालीक शहा युनुस शहा यांनी मलकापूर शहर पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे … Read more

मलकापुर बसस्थानकावर सुविधांचा अभाव; शिवसेना (उबाठा) चे आगार व्यवस्थापकांना निवेदन

मलकापूर:- मलकापुर शहरातील बसस्थानक परिसरात पिण्याचे पाणी, सि.सि.टि व्ही कॅमेरे, चौकशी कक्षावरील दुरध्वनी सतत ना दुरुस्त असून बऱ्याच सुविधांचा अभाव असल्यामुळे आज शिवसेना उबाठा उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर सह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आगार व्यवस्थापक मुकूंद न्हावकर यांना निवेदन दिले आहे. निवेदनात नमूद केले आहे की, सद्य स्थितीत उन्हाळा त्रीव जाणवत असल्याने बसस्थानकावर प्रवाश्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे … Read more

अनुराबाद शिवारातून 16 क्विंटल तूर चोरी; अज्ञात चोरट्यांविरुद्ध मलकापूर पोलिसांत गुन्हा दाखल!

मलकापूर :- तालुक्यातील अनुराबाद शिवारात एका शेतकऱ्याच्या गोठ्यातून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 73 हजार 600 रुपये किमतीची 16 क्विंटल तूर चोरून नेल्याची घटना 13 मार्च रोजी उघडकीस आली. या प्रकरणी मलकापूर शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनुराबाद येथील तरुण शेतकरी मयुर राजेंद्र नारखेडे (वय 21) यांनी शेतातील तुरीची मळणी करून अंदाजे … Read more

गांधी चौकात ठेलेधारकांचा रस्त्यावर कब्जा; गर्दीमुळे अपघात किंवा धक्का लागून वाद होण्याची शक्यता

मलकापूर :- मलकापूर शहरातील सर्वात गजबजलेल्या आणि मुख्य समजल्या जाणाऱ्या गांधी चौक परिसरात सध्या ठेलेधारकांनी भर रस्त्यात ठेले लावून अक्षरशः कब्जा केल्याचे चित्र दिसून येत आहे. ईद सणाच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असताना रस्त्याच्या मधोमध लावलेल्या ठेल्यांमुळे नागरिकांना जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागत आहे. गांधी चौक हा शहरातील अत्यंत महत्त्वाचा वर्दळीचा … Read more