भिलवाडा परिसरात मटका जुगारावर पोलिसांची धाड; एक आरोपी अटकेत!

बुलढाणा :- शहरातील भिलवाडा परिसरात सुरू असलेल्या मटका जुगारावर बुलढाणा शहर पोलिसांनी धाड टाकत एका आरोपीला अटक केली. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. गोपनीय माहितीनुसार, शहिस्ता किराणा दुकानाजवळ सार्वजनिक ठिकाणी काही जणांकडून मटका जुगार खेळवला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत घटनास्थळी धाड टाकली. पोलिसांना पाहताच काही जणांनी तेथून पळ काढला, मात्र मुख्य आरोपीला पकडण्यात यश आले. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव शेख मुस्तकीम शेख सलीम (वय ३९, रा. भिलवाडा, बुलढाणा) असे आहे. पंचांसमक्ष करण्यात आलेल्या झडतीत त्याच्याकडून मटक्याच्या आकड्यांच्या चिठ्ठ्या, पेन, कार्बनचा तुकडा तसेच १,०२० रुपयांची रोकड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Comment