कुटुंबातील गंभीर अत्याचारप्रकरणी १३ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

 

देऊळगाव राजा :- शहरात एका कुटुंबात घडलेल्या धक्कादायक अत्याचारप्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाई करत एकूण 13 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणातील पीडित महिला व अल्पवयीन बालक यांची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिच्या पतीवर अल्पवयीन बालकाशी अयोग्य वर्तन केल्याचा तसेच पत्नीवर तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. हा प्रकार काही महिन्यांपासून सुरू असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. महिलेने हा प्रकार कुटुंबीयांना सांगितल्यानंतर तिला धमक्या देण्यात आल्याचेही समोर आले आहे. तसेच आर्थिक कारणांवरूनही तिचा छळ करण्यात आल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी संबंधित पतीसह कुटुंबातील इतर सदस्यांविरुद्ध गुन्हे नोंदवले असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Leave a Comment