कामावर जातो सांगून घराबाहेर पडलेला २२ वर्षीय युवक बेपत्ता; मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल

मलकापूर :- तालुक्यातील हिंगणाकाझी येथील २२ वर्षीय युवक कामासाठी जातो असे सांगून घरातून निघून गेल्यानंतर परत न आल्याने कुटुंबीयांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. याप्रकरणी आईच्या फिर्यादीवरून मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली आहे. मलकापूर तालुक्यातील हिंगणाकाझी येथील रहिवासी रेहानाबी शेख समीर पिंजारी (वय ३९) यांनी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद … Read more

मलकापूर बसस्थानकावर ‘नाथजल’ पाण्याची बाटली १५ ऐवजी २० रुपयांना विक्री; मनसे पदाधिकाऱ्याची तक्रार

मलकापूर :- मलकापूर येथील एसटी बसस्थानकावर ‘नाथजल’ पिण्याच्या पाण्याची बाटली निर्धारित १५ रुपयांच्या ऐवजी २० रुपयांना विक्री केली जात असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका उपप्रमुख रामधन खोडके यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रकांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे. रामधन … Read more

मलकापूरात गुढीपाडव्याच्या निमित्ताने महिलांची भव्य मोटरसायकल रॅली; उत्साहाचा जल्लोष

मलकापूर :- हिंदू नववर्ष गुढीपाडव्याच्या निमित्ताने मलकापूर शहरातून महिलांची भव्य मोटरसायकल रॅली उत्साहात पार पडली. सांस्कृतिक वेशभूषेत सजलेल्या महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत शहरात नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष साजरा केला. दरवर्षीप्रमाणे यंदाही नववर्ष स्वागतासाठी महिला रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, यावर्षी रॅलीने अधिक भव्य स्वरूप धारण केले. सकाळी गुढीपूजन व ध्वजपूजन करून रॅलीला सुरुवात करण्यात … Read more

धुपेश्वर विठ्ठल लहरी बाबांचे कृपेने मलकापुर बसस्थानकावर आर.ओ वाॅटर ची पाणपोई सुरू

मलकापुर:- मराठी नववर्षाच्या शुभपर्वावर गुढीपाडव्याच्या दिवशी मलकापुर येथील बसस्थानकात धुपेश्वर येथील विठ्ठल लहरी बाबांचे कृपेने आर.ओ च्या थंडगार पाणपोई चे उद्घाटन पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांच्या हस्ते नारळ फोडून तर आगार व्यवस्थापक मुकूंद न्हावकर, शिवसेना शहरप्रमुख हरीदास गणबास, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक साहेबराव खांडेकर यांच्या उपस्थितीत योगेश उर्फ टिनू पटेल (गुलाब जर्दा … Read more

मलकापूरात अवैध गॅस भरणाऱ्या अड्ड्यांवर पोलिसांची धडक कारवाई; पाच जणांवर गुन्हे दाखल

मलकापूर: शहरातील नागरी वस्त्यांमध्ये घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरमधून वाहनांमध्ये बेकायदेशीररीत्या गॅस भरणाऱ्या अड्ड्यांवर पोलिसांनी मंगळवारी (१७ मार्च) मोठी धडक कारवाई केली. या कारवाईत विविध ठिकाणांहून एक लाखाहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. खामगाव येथील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, मलकापूर शहरातील मुश्ताकअलीनगर, शिवाजीनगर आणि … Read more

पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर येथे राष्ट्रीय स्तरावरील प्रोजेक्ट स्पर्धा उत्साहात संपन्न

मलकापूर : स्थानिक पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय व पॉलिटेक्निक, मलकापूर येथे अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय स्तरावरील प्रोजेक्ट स्पर्धेचे आयोजन दिनांक 16 मार्च रोजी उत्साहात करण्यात आले. या स्पर्धेत देशातील विविध राज्यांमधील अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदविला. जवळपास २५० हून अधिक विद्यार्थ्यांनी आपले नाविन्यपूर्ण व तांत्रिकदृष्ट्या समृद्ध … Read more

मुंदडा पंपाजवळ कंटेनरची पिकअपला धडक; चौघे जखमी

मलकापूर :- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील मुंदडा पेट्रोल पंपाजवळ भरधाव कंटेनरने बोलेरो पिकअपला दिलेल्या जोरदार धडकेत चालकासह तीन मजूर जखमी झाल्याची घटना 14 मार्च रोजी पहाटे घडली. या अपघातात पिकअप वाहन रस्त्याच्या खाली पलटी झाल्याने मोठे नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी टळली. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथील पंकज मंगल धनगर (वय 35) हे … Read more

पाणीपुरवठा विभागातील झाडे तोड प्रकरणी उशिरा गुन्हा दाखल; अज्ञात आरोपीवर कारवाई

मलकापूर : शहरातील पाणीपुरवठा विभागाच्या फिल्टर प्लांट परिसरातील झाडे तोडल्याच्या प्रकरणात अखेर १० दिवसांनी नगर परिषद प्रशासनाने तक्रार दाखल करत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या उशिरामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये चर्चा रंगत आहे. सविस्तर वृत्त असे की, नगर परिषद पाणीपुरवठा विभागाच्या फिल्टर प्लांट परिसरात ८ मार्च रोजी दुपारी १२ वाजताच्या … Read more

मलकापूरात २२ ठिकाणी धाडी; ७ हॉटेलमधून घरगुती गॅस सिलेंडर जप्त

मलकापूर : घरगुती एलपीजी गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पुरवठा विभागाने शहरात मोठी कारवाई करत २० ते २२ हॉटेलांवर धाडी टाकल्या. या धाडीत सात हॉटेल धारकांकडून घरगुती गॅस सिलेंडरचा गैरवापर आढळून आल्याने ते जप्त करण्यात आले असून पुढील कारवाई सुरू आहे. सद्यस्थितीत इंधन तुटवड्याची शक्यता लक्षात घेता घरगुती गॅसचे वितरण सुरळीत राहावे, यासाठी केंद्र व राज्य … Read more

“सकाळी धक्का का दिला” म्हणत लोखंडी पाइपने मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा; मलकापूरातील घटना

मलकापूर : किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे गंभीर रूप घेत मारहाणीपर्यंत प्रकरण पोहोचल्याची घटना शहरातील मुस्ताक अलीनगर परिसरात घडली. या प्रकरणात लोखंडी पाइपने हल्ला करून अनेकांना जखमी केल्याप्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी शेख रिजवान शेख समशेर (वय ३८) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी जबीर खान इसा खान (वय १८) … Read more