दोन तासांत सोन्याच्या पोत लुटीचा उलगडा; चार आरोपी जेरबंद

दुसरबीड :- सोन्याची पोत लुटण्याच्या घटनेचा अवघ्या दोन तासांत छडा लावत किनगाव राजा पोलिसांनी गुन्हेगार टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत मुख्य आरोपीसह चार जणांना अटक करण्यात आली असून, अनेक गुन्ह्यांची उकल झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १७ मार्च रोजी गजानन ताठे (रा. दुसरबीड) यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या आईच्या गळ्यातील सुमारे १३ ग्रॅम मणी … Read more

धुपेश्वर विठ्ठल लहरी बाबांचे कृपेने मलकापुर बसस्थानकावर आर.ओ वाॅटर ची पाणपोई सुरू

मलकापुर:- मराठी नववर्षाच्या शुभपर्वावर गुढीपाडव्याच्या दिवशी मलकापुर येथील बसस्थानकात धुपेश्वर येथील विठ्ठल लहरी बाबांचे कृपेने आर.ओ च्या थंडगार पाणपोई चे उद्घाटन पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांच्या हस्ते नारळ फोडून तर आगार व्यवस्थापक मुकूंद न्हावकर, शिवसेना शहरप्रमुख हरीदास गणबास, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक साहेबराव खांडेकर यांच्या उपस्थितीत योगेश उर्फ टिनू पटेल (गुलाब जर्दा … Read more

जातीवाचक शिवीगाळ करत महिलेला मारहाण; आरोपीवर गुन्हा दाखल; लोणार येथील घटना

लोणार : तालुक्यातील उदनापूर येथे एका ६० वर्षीय महिलेवर जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध लोणार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप त्याला अटक झालेली नाही. सविस्तर माहिती अशी की, १२ मार्च रोजी भीकाबाई लक्ष्मण नेमाडे (वय ६०) या आपल्या गावात सामाजिक कार्यात सक्रिय असताना … Read more

शेतात जेवणासाठी बसलेल्या महिलांवर ‘मोहोळा’चा अचानक हल्ला; ६ जण जखमी; मेहकर येथील घटना

मेहकर: परतापूर शिवारातील एका शेतात दुपारच्या सुमारास अचानक आग्या मोहोळाच्या हल्ल्यामुळे गोंधळ उडाला. जेवणासाठी झाडाखाली बसलेल्या महिलांवर माशांनी हल्ला चढवला. या घटनेत पाच महिला, एक लहान मुलगी तसेच जनावरे जखमी झाली असून सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रामनगर परिसरातील विजय रामदास गिहे यांच्या शेतात दुपारी काम आटोपल्यानंतर काही महिला मजूर जांभळीच्या झाडाखाली जेवण्यासाठी … Read more

मलकापूरात अवैध गॅस भरणाऱ्या अड्ड्यांवर पोलिसांची धडक कारवाई; पाच जणांवर गुन्हे दाखल

मलकापूर: शहरातील नागरी वस्त्यांमध्ये घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरमधून वाहनांमध्ये बेकायदेशीररीत्या गॅस भरणाऱ्या अड्ड्यांवर पोलिसांनी मंगळवारी (१७ मार्च) मोठी धडक कारवाई केली. या कारवाईत विविध ठिकाणांहून एक लाखाहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. खामगाव येथील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, मलकापूर शहरातील मुश्ताकअलीनगर, शिवाजीनगर आणि … Read more

पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर येथे राष्ट्रीय स्तरावरील प्रोजेक्ट स्पर्धा उत्साहात संपन्न

मलकापूर : स्थानिक पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय व पॉलिटेक्निक, मलकापूर येथे अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय स्तरावरील प्रोजेक्ट स्पर्धेचे आयोजन दिनांक 16 मार्च रोजी उत्साहात करण्यात आले. या स्पर्धेत देशातील विविध राज्यांमधील अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदविला. जवळपास २५० हून अधिक विद्यार्थ्यांनी आपले नाविन्यपूर्ण व तांत्रिकदृष्ट्या समृद्ध … Read more

मुंदडा पंपाजवळ कंटेनरची पिकअपला धडक; चौघे जखमी

मलकापूर :- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील मुंदडा पेट्रोल पंपाजवळ भरधाव कंटेनरने बोलेरो पिकअपला दिलेल्या जोरदार धडकेत चालकासह तीन मजूर जखमी झाल्याची घटना 14 मार्च रोजी पहाटे घडली. या अपघातात पिकअप वाहन रस्त्याच्या खाली पलटी झाल्याने मोठे नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी टळली. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथील पंकज मंगल धनगर (वय 35) हे … Read more

पाणीपुरवठा विभागातील झाडे तोड प्रकरणी उशिरा गुन्हा दाखल; अज्ञात आरोपीवर कारवाई

मलकापूर : शहरातील पाणीपुरवठा विभागाच्या फिल्टर प्लांट परिसरातील झाडे तोडल्याच्या प्रकरणात अखेर १० दिवसांनी नगर परिषद प्रशासनाने तक्रार दाखल करत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या उशिरामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये चर्चा रंगत आहे. सविस्तर वृत्त असे की, नगर परिषद पाणीपुरवठा विभागाच्या फिल्टर प्लांट परिसरात ८ मार्च रोजी दुपारी १२ वाजताच्या … Read more

मलकापूरात २२ ठिकाणी धाडी; ७ हॉटेलमधून घरगुती गॅस सिलेंडर जप्त

मलकापूर : घरगुती एलपीजी गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पुरवठा विभागाने शहरात मोठी कारवाई करत २० ते २२ हॉटेलांवर धाडी टाकल्या. या धाडीत सात हॉटेल धारकांकडून घरगुती गॅस सिलेंडरचा गैरवापर आढळून आल्याने ते जप्त करण्यात आले असून पुढील कारवाई सुरू आहे. सद्यस्थितीत इंधन तुटवड्याची शक्यता लक्षात घेता घरगुती गॅसचे वितरण सुरळीत राहावे, यासाठी केंद्र व राज्य … Read more

पत्ता खेळण्यासाठी नकार दिल्याने मारहाण; दोन्ही बाजूंनी तक्रारी दाखल; खामगाव येथील घटना

खामगाव : तालुक्यातील गणेशपूर येथे पत्ते खेळण्याच्या कारणावरून दोन व्यक्तींमध्ये झालेला वाद मारहाणीपर्यंत पोहोचल्याची घटना १५ मार्च रोजी घडली. या प्रकरणात दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी तक्रारी दिल्याने हिवरखेड पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गणेशपूर येथील कैलास देविदास टेटवार (वय ३८) व बिस्मीला खान सुलेमान खान (वय ४०) हे एकाच गावातील रहिवासी आहेत. टेटवार … Read more